Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

लष्करानं प्रसिद्ध केल्या हिममानवाच्या अस्तित्वाच्या ‘पाऊल’खुणा?

लष्करानं प्रसिद्ध केल्या हिममानवाच्या अस्तित्वाच्या ‘पाऊल’खुणा?

हिमालयातील बर्फाळ प्रदेशात हिममानवाच्या पावलाचे ठसे आढळले असून भारतीय सैन्यानेच ट्विटरद्वारे हे फोटो प्रसिद्ध केले आहे. यामुळे हिममानवाच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे.

हे ठसे हिममानव ‘यती’च्या पायांचे असू शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे. ‘भारतीय लष्कराच्या एका गिर्यारोहक पथकाला पहिल्यांदाच मकालू बेस कॅम्पजवळ जवळपास ३२*१५ इंचाचे रहस्यमयी हिममानव यतीच्या पायांचे ठसे सापडले आहेत. तर हा मायावी हिममानव याआधी ९ एप्रिल २०१९ रोजी केवळ मकालू-बरुन नॅशनल पार्कमध्ये दिसला होता,’ असं लष्कराने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

यती हा जगातील रहस्यमयी प्राण्यापैकी एक आहे. अनेकदा हा प्राणी दिसल्याची माहिती समोर आली आहे. लडाखमधल्या बौद्ध मठांमध्ये राहणाऱ्या काहींनी हिममानव यती दिसल्याचा दावा केला आहे. यती हा माणूस नसून तो ध्रुवीय आणि तपकिरी रंगाच्या अस्वलाचीच एक प्रजात असलेला प्राणी आहे जो हिमालयात राहतो असे काही संशोधनकर्ते मानतात. अस्वलासारखा आणि संपूर्ण शरिरावर केसांनी झाकलेला असल्यासारखा दिसतो. यती हा शक्तीशाली असतो. यती दिसल्याची माहिती १९२५ मध्ये एका जर्मन फोटोग्राफरच्या रिपोर्टनुसार समोर आली होती.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *