स्कायमेट नुसार मुंबईत पावसाचा जोर कमी तर भारतीय हवामान खात्यानुसार मुंबई व उपनगरात अतिवृष्टीचा इशारा
मुंबई: गेल्या २४ तासांत मुंबई पावसाचा जोर कायम राहिला असून सांताक्रूझ येथे आज पहाटे ५:३० पर्यंत २१ तासांच्या कालावधीत २५ मिमी पावसाची नोंद झाली.
काल एक-दोन ठिकाणी जोरदार सरींसह शहर आणि उपनगरात मध्यम पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात व आसपासच्या परिसरात पाणी साचले होते.
तथापि, स्कायमेटच्या हवामानशास्त्रज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे की, पावसाळी गतिविधींमध्ये आणखी घट होईल आणि पुढील २४ तासात शहराच्या काही भागात एक-दोन सरींसह हलका पाऊस पडेल. पण त्याचवेळी भारतीय हवामान खात्यानुसार मुंबई व उपनगरात अतिवृष्टी होऊ शकते. तसेच रायगड जिल्ह्यातही मुसळधार पाऊस चालूच राहणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.
उद्या, पावसाचा जोर आणखी कमी होईल आणि शहर आणि उपनगरामध्ये तुरळक हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर कमी झाली की, तापमान पुन्हा वाढण्याच्या मार्गावर येईल, ज्यामुळे हवामान अस्वस्थ आणि दमट होईल. त्यानंतर पुढील तीन ते चार दिवस हवामानाची हि परिस्थिती कायम राहील.
(सौजन्य – स्कायमेट वेदर)
