
बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खवळलेल्या समुद्रात न जाण्याचा मच्छिमारांना इशारा
सिंधुदुर्ग, दि. १०: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, वैभववाडी तालुक्यात हा पाऊस पडला. पहाटे ५ वाजता पावसाला सुरुवात झाली. त्यांनतर थांबून थांबून पाऊस पडत होता. पावसामूळे दिवसभराच्या तापमानात काहीशी घट झाल्यानं उष्म्यामुळं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. त्यानंतर दुपारी ४ वाजल्या पासून विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे .
दरम्यान बिपरजॉय चक्रीवादळामुळे समुद्र सुद्धा खवळलेला असून मोठ्या लाटा उसळत असल्याने मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये अस आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. अमरावतीतही पाऊस झाला. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातल्या सिल्लोड शहरासह तालुक्यात संध्याकाळपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. चंद्रपूर जिल्ह्यात बहुतांश भागात आज संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाचं आगमन झालं. वेगवान वाऱ्यामुळे नवरगाव, ब्रम्हपुरी तालुक्यातली काही घरं आणि गुरांच्या गोठ्याची छपरं उडून गेली.
Source – AIR