शिवसेना खासदार एनडीए च्या बैठकीला जाणार नाहीत : संजय राऊत
मुंबई/नवी दिल्ली: १८ नोव्हेंबर पासून संसदेत हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला एनडीए ची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला शिवसेना खासदार अनुपस्थित राहणार असल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. उद्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी असून यावेळी सर्व शिवसेना खासदार तेथे हजर राहणार आहेत. शिवसेना-भाजप मधला दुरावा पाहता उद्या एनडीए च्या बैठकीतील शिवसेनेची अनुपस्थिती ही इतर मित्रपक्षांना सलणारी राहू शकते.
