Manisha Kayande
ईडी ची पीडा टाळण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटलांनी सुजयला भाजपात पाठवले का? : शिवसेना
गेल्या बऱ्याच दिवसांपासून विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा चालू आहेत. शिवसेना प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांनी नेमका त्याच विषयावर त्यांना टोला लगावला आहे. त्या म्हणाल्या, “राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्यावरील आणि त्यांच्या परिवारावरील ईडी ची कारवाई थांबवण्यासाठी सुजय यांना भाजप मध्ये पाठवले का? सध्या ते भाजप नेते गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करत आहेत अशी बातमी आली म्हणून विचारले.” “तसेही राधाकृष्ण विखे पाटील विरोधीपक्ष नेते कमी आणि शासनाचे दूत म्हणूनच कार्यरत होते हे आपण गेले काही वर्ष अनुभवले आहेच. विधानसभेत भाजपाला विरोधी पक्ष नेत्यांनी मदत करण्यामागेही त्यांचा एक पाय भाजपत तर एक काँग्रेस मध्ये अशी अवस्था असण्यामागेही त्यांना आपल्यावर ईडीची कारवाई तर होणार नाहीना? अशी भीती वाटत तर नव्हती ना? असेही त्या उपहासाने म्हणाल्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मोठा भूकंप पाहायला मिळू शकतो याची जणू नांदीच झाली आहे.
