Kalyan SKalyan Shivsenahivsena
शिवसेनेतर्फे कल्याण येथे पेढे वाटून व ढोल ताशाच्या गजरात हवाई दलाने पाक विरुद्ध केलेल्या कामगिरीचे कौतुक
आज पहाटे भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी कारवाई करत दहशतवाद्याचे तळ उध्वस्त केले आहेत. भारताच्या लढाऊ मिराज २००० या विमानाने एलओसी पार करून दहशतवादी तळांवर १ हजार किलो बॉम्ब टाकले. यात अनेक दहशतवाद्याचा खात्मा झाल्याची बातमी नागरिकांना समजताच देशभरात जल्लोष साजरा करण्यात येत आहे.
कल्याण पूर्वेतील शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक नवीन गवळी यांनी सुद्धा आपल्या प्रभागातील चक्की नका भागात फटाके फोडून, पेढे वाटून भारतीय हवाई दलाच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
यावेळी नगरसेवक नवीन गवळी यांच्यासह राजू उजगरे, मारुती डोंगरे, सुभाष गायकवाड, विक्रम म्हात्रे, जगदीश राठोड, अनिल पांडे,
वैभव राऊत, प्रल्हाद फुलोरे तसेच गावदेवी प्रतिष्ठान संस्थेचे सदस्यदेखील यावेळी उपस्थित होते.
