“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंत, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी”
मराठी भाषा दिवस दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.
ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस म्हणून मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो.
१९८७ साली शिरवाडकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यानंतर शासनाने हा दिवस गौरव दिन म्हणून जाहीर केला. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा,हि समस्त मराठीजनांची मागणी आहे.
महाराष्ट्र वार्ता टीमच्या वतीने जगातील सर्व मराठी प्रेमींना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !