Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांसाठी शिवसेना-भाजप युतीची घोषणा

लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांसाठी शिवसेना-भाजप युतीची घोषणा

शिवसेना-भाजप ह्या दोन पक्षांची युती होणार की नाही होणार याचं कोडं आज शेवटी सुटलं. येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूका एकत्र येऊन लढण्याची घोषणा आज संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते मनोहर जोशी, भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

लोकसभेसाठी भाजप २५ आणि शिवसेना २३ जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहेत. व्यापक लोकहितासाठी आम्ही एकत्र आलो आहोत आस उद्धव ठाकरे म्हणाले. जनभावनेच्या आग्रहास्तव आम्ही येत्या निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सविस्तर बातमी थोड्याच वेळात……

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *