शिवसेनेचे अबतक ‘६४’, अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सेनेला जाहीर पाठिंबा
मुंबई: सध्या शिवसेना भाजप मधील सत्तासंघर्ष पेटला आहे. कोणाचा मुख्यमंत्री होणार? कोणाकडे किती आणि कोणती खाती येणार हेही आद्यप गुलदस्त्यात आहे. एक एक आमदारही या क्षणाला गरजेचा आहे. काल कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला. या संदर्भात त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेत पाठिंब्याचे अधिकृत पत्र त्यांच्या हाती सोपवले. या प्रसंगी शिवसना विधिमंडळ गटनेते आमदार एकनाथ शिंदे उपस्थित होते.
यड्रावकर यांच्या पाठिंब्या नंतर शिवसेनेचे संख्याबळ ६४ वर पोहोचले आहे.
