Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवसेनेला धक्का !

महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य १५ आमदारांना अपात्र ठरवण्या संदर्भातील याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

मुंबई/नवी दिल्ली : महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य १५ आमदारांना  अपात्र ठरवण्या संदर्भात शिवसेनेने दाखल केलेल्या ताज्या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला यांच्या खंडपीठानं आज हा आदेश दिला. येत्या ११ जुलैला मुख्य याचिकेवर सुनावणी ठेवली आहे.

एकनाथ शिंदे आणि अन्य १५ आमदारांना त्यांच्या पात्रतेविषयीचा निर्णय येईपर्यंत सभागृहातून निवलंबित करण्यात यावं अशी याचिका शिवसेनेचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांनी आज सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केली होती. एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य आमदारांना अपात्रतेविषयीच्या नोटीसला उत्तर देण्याकरता १२ जुलैपर्यंतची मुदत न्यायालयानं दिली आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *