Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘मविआ’ तर्फे विधानसभा अध्यक्ष पदासाठी सेनेच्या राजन साळवी यांनी भरला अर्ज

सेनेचे आमदार सेनेचा विधानसभा अध्यक्ष निवडून देतील का?

मुंबई, दि. २ : विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपने राहुल नार्वेकर यांना उभे केले आहे. पण, महाविकास आघाडी तर्फे कोण उभा राहणार हे फॉर्म भरण्याच्या शेवटच्या अर्ध्या तासापर्यंत गुलदस्त्यात होते. परंतू, शिवसेना उपनेते आ. राजन साळवी यांनी आज अध्यक्ष पदासाठी चा अर्ज भरत सस्पेन्स मिटवून टाकला. राजन साळवी यांचा उमेदवारी अर्ज भरताना महाविकासआघाडी तर्फे जयंत पाटील, सुनील प्रभू, बाळासाहेब थोरात व अशोक चव्हाण आदी नेते उपस्थित होते.

शिवसेनेत बंड झाल्यावर राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत न जाता सेनेतच राहणे पसंत केले. विधानसभेत ते रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा-राजापूर-साखरपा मतदारसंघाचे नेतृत्व करतात. शिवसेनेतून राजकीय कारकीर्द सुरू केलेल्या राजन साळवी यांनी रत्नागिरी जिल्हाप्रमुख पदही सांभाळले होते. शिवाय रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील माजी मंत्री भाजपचे बाळ माने यांना पराभूत करण्यातही राजन साळवी हेच होते. त्यामुळे भाजप शी दोन हात करण्याचा त्यांचा अनुभव त्यांना आता कामी येतो का हे पाहणे लक्षणीय ठरेल. राजन साळवी व एकनाथ शिंदे यांचे संबंध हे घनिष्ठ मैत्रीचे आहेत परंतू आता ते एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे पाहायला मिळते आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *