शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार व अन्य क्रीडा पुरस्कारांच्या सुधारित नियमावलीकरिता सुचना, अभिप्राय पाठविण्याचे आवाहन
शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणाबाबत खेळाडू, नागरिक, संघटना यांच्याकडून सूचना व अभिप्राय २२ जानेवारी २०२१ पर्यंत मागविण्याचे शासनाने निर्देशित केलेले आहे. पुरस्काराच्या प्रस्तावित सुधारणा नियमावलीची प्रत क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
पुरस्कार नियमावलीच्या प्रस्तावित सुधारणांबाबत खेळाडू, नागरिक, संघटना यांनी आपल्या सुचना/अभिप्राय dsysdeskI4@gmail.com किंवा desk14.dsys-mh@gov.in मेलवर २२ जानेवारी २०२१ रोजी पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांचेमार्फत करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, विभागीय उपसंचालक कार्यालय अथवा क्रीडा व युवकसेवा संचालनालय शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे, बालेवाडी, पुणे यांचेशी संपर्क साधावा, असे क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
