Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

शिवसेनेचे अँग्री सुपरमॅन नितीन नांदगावकर आले पोलिसांच्या मदतीला धावून

पोलिसांचे पैसे बुडवणाऱ्या नवी मुंबईतील अगरवाल बिल्डर्स ला दिला निर्वाणीचा इशारा

नवी मुंबई: शिवसेनेचे अँग्री सुपरमॅन नितीन नांदगावकर हे महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीला धावून आले आहेत. या संदर्भातला एक व्हिडिओ त्यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वरून पोस्ट केला असून पोलीसांसोबत नवी मुंबईतील नेरुळ रेल्वे स्टेशन स्थित अग्रवाल बिल्डर्स यांच्या कार्यालयावर थेट धडक दिल्याचे त्यात दिसत आहे.

नवी मुंबईतील नेरुळ स्थित अग्रवाल बिल्डर्स यांनी पोलीस दलातील जवळपास २४० पोलिसांना घर बांधून देण्यासाठी पैसे घेतले होते. या प्रकरणी आपले पैसे परत मिळण्याची लक्षणं दिसत नसल्याचे जाणवल्यावर त्यांनी शिवसेना भवन इथे शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांची भेट घेतली व आपलं गाऱ्हाण मांडलं. यानंतर नांदगावकर यांनी बिल्डर अग्रवाल याला शिवसेना भवनात बोलावून घेत पोलिसांचे पैसे परत देण्यास सांगितलं. यावेळी अग्रवाल याने नांदगावकर यांना पोलिसांचे पैसे परत देण्यासाठी एकत्र बैठक घेऊन योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

व्हिडिओ पहा आणि आमच्या चॅनेल ला Subscribe करा

पण कालांतराने बिल्डर वारंवार शब्द फिरवत असल्यामुळे अखेर नितीन नांदगावकर यांना त्याच्या ऑफिसवर धडक द्यावी लागली. नांदगावकर यांनी निघताना या बिल्डर ला शेवटचा निर्वाणीचा इशारा दिला असून पोलिसांचे पैसे परत न दिल्यास सेना स्टाईल चा अवलंब करावा लागेल असे सांगितले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *