अबे ओ सांबा..आपके पिछे कितने गब्बर छूपे हैं? – आशिष शेलार
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी गुरुवारी ट्विटरवरुन मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर खोचक टीका केली होती. धनंजय मुंडे यांच्या ट्विटनंतर आशिष शेलार यांनी देखील शुक्रवारी ट्विटरच्या माध्यमातूनच पलटवार केला आहे.
आशिष शेलार ट्विटमध्ये म्हणतात की, रक्तात राष्ट्रवाद असलेल्या पक्षाला सोडून फक्त नावात राष्ट्रवाद असलेल्यांच्या नादी लागलेले..स्वतःच्या काका, ताईला सोडून बारामतीच्या काका, ताईंचा प्रचार करणारे…धनंजयराव चिडले? लेकीन अबे ओ सांबा..आपके पिछे कितने गब्बर छूपे हैं.. ? वो तो देखलो !..लढ धन्नो..!!.
आशिष शेलार यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देखील ट्विटरच्या माध्यमातून टीका केली होती.
रक्तात राष्ट्रवाद असलेल्या पक्षाला सोडून फक्त नावात राष्ट्रवाद असलेल्यांच्या नादी लागलेले..स्वतःच्या काका,ताईला सोडून बारामतीच्या काका,ताईंचा प्रचार करणारे…धनंजयराव चिडले? लेकीन अबे ओ सांबा..आपके पिछे कितने गब्बर छूपे हैं.. ?वो तो देखलो !..लढ धन्नो..!!#ChokidarकेSideEffects
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 29, 2019
