ब्रेकिंग News : फोटो बघा, एकमेव मनसे आमदार शरद सोनवणेंचा उद्या शिवसेनेत प्रवेश
कालपासून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एका बातमीने खळबळ उडवून दिला आहे. ती म्हणजे मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे स्वगृही शिवसेनेत परत येत आहेत. आम्ही काल आमच्या सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली होती. ह्या बातमीने महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवून आणला. ती बातमी खरी की खोटी ह्यावर आज दिवसभर बराच कल्लोळ उडाला होता. त्यानंतर दुपारपासून आ. शरद सोनवणेंचे काही पोस्टर सोशल मीडियावर वायरल होत होते. ते आमच्या हाती लागले आहेत. त्यामध्ये सर्वांत वर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो, त्याखालोखाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि मध्ये आ. शरद सोनवणे दिसत आहेत. तसेच खाली जाहीर प्रवेशाचे तपशील आहेत. सोमवार दि. ११ मार्च २०१९ दुपारी २:००.
आ. शरद सोनवणे हे मनसे सोडून पुन्हा शिवसेनेत का परतत आहेत ह्या प्रश्नाचं कोडं उद्याच सुटेल. पण ह्या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर मनसैनिकांची घालमेल चालू आहे. मनसेच्या व्यासपीठावर कधीही न दिसणारा आमदार अशी त्यांची सर्व मनसैनिकांत सदैव चर्चा राहिलीय.

