…पण मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत – शरद पवार
यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील असे मला वाटत नाही असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केले.
2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा हा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरेल. पण भाजपाला स्वतः ची सत्ता स्थापन करण्यासाठी इतर पक्षांची मदत घ्यावी लागेल असेही शरद पवार म्हटले आहे.
सर्वच पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी अपयशी ठरलेले आहेत त्यामुळे ते परत पंतप्रधान होणार नाहीत. असे भाकित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तवले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप पक्षाची युती होईल, असे मी आधीच सांगितले होते. तो माझा अंदाज आज खरा ठरला आहे, असेही शरद पवार म्हणाले.
