Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

प्रियंका गांधींनी केलं पहिलं ट्विट

Priyanka Gandhi

प्रियंका गांधींनी केलं पहिलं ट्विट

काँग्रेसने लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधून केली. गुजरातमध्ये कार्यकारिणीची बैठक व जाहीर सभा घेत काँग्रेसने प्रचाराचा नारळ फोडला. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी प्रथमच मंगळवारी गुजरातमधील गांधीनगर येथे जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. गुजरातमधील जाहीर सभेनंतर प्रियंका गांधी यांनी पहिलं ट्वीट केलं.

प्रियंका गांधी यांनी फेब्रुवारी 2019 मध्येच ट्विटर अकाऊंट सुरू केलं आहे. मंगळवारी त्यांनी पहिलं ट्वीट केलं. तसेच साबरमतीच्या साध्या प्रतिष्ठेत सत्यतेचं वास्तव्य आहे असं ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्यानंतर पाच मिनिटांनंतर प्रियंका गांधी यांनी दुसरं ट्वीट केलं. ट्वीटमध्ये त्यांनी साबरमती आश्रमामधील फोटो पोस्ट केला आहे. तसेच महात्मा गांधी यांनी दिलेला अहिंसेचा संदेश त्यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये दिला आहे.

‘प्रियंका गांधी वाड्रा’ या नावाने प्रियंका गांधी यांनी ट्विटरवर अधिकृत अकाऊंट सुरू केले आहे. प्रियंका गांधी यांनी अधिकृत ट्विटर अकाऊंट सुरू केल्यानंतर त्यांना फॉलो करण्यासाठी फॉलोअर्सची मोठ्या प्रमाणात झुंबड उडाली आहे. आतापर्यंत जवळपास २.५ लाख फॉलोवर्स त्यांना लाभले आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *