Sharad Pawar at Maval
शरद पवारांनी घेतली अजित पवारांची फिरकी
पुणे: साहेब या वयात सुद्धा फिरतात, असे सांगणाऱ्या अजित पवारांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या शैलीत फिरकी घेतली.
चिंचवडमध्ये नातू पार्थ पवार यांच्यासाठी प्रचार सभा घेतली असतात त्या सभेत भाषण करताना शरद पवार म्हणाले, अजितने सांगितली गोष्ट मला काही फारशी आवडली नाही. या वयात सुद्धा साहेब फिरतात….अरे,मी काय म्हातारा झालो का? असं म्हणताच उपस्थित नागरिकांमध्ये एकच हशा पिकला.
आपल्या भारत देशात परिवर्तन झाल्याशिवाय महाराष्ट्राचा हा सुपुत्र गप्पा बसणार नाही. ५६ इंच छाती असल्याचं मी कधी सांगितलं नाही. पण आमच्या मनगटात या मातीचं रक्तं आहे असेही शरद पवारांनी सांगितले.
