Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पहा पंकजा मुंडेच्या ट्विटरवर जुनेच नाव कायम

PANKAJA MUNDE 2

पहा पंकजा मुंडेच्या ट्विटरवर जुनेच नाव कायम

लोकभा निवडणुकीच्या रिंगणात मोदींनी आपल्या विरोधकाच्या टीकेला उत्तर देण्यासाठी आपल्या ट्विटरवरील नावापुढे चौकीदार शब्द लावला. त्यानंतर भाजपाच्या सर्व मंत्र्यांनी, खासदारांनी, नेत्यांनी आप-आपल्या नावापुढे चौकीदार हा शब्द जोडला. मोदींच्या समर्थकांनीदेखील त्यांच्या नावापुढे हा शब्द जोडत त्यांना समर्थन दिलं. यानंतर ट्विटरवर हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोठपाठ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षण मंत्री विनोद तावडे, महिला बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, अन्न आणि पुरवठा मंत्री गिरीश बापट, पर्यावरणमंत्री प्रवीण पोटे, जलसंपदा राज्यमंत्री राम शिंदे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी आपल्या नावापुढे चौकीदार शब्द जोडला आहे.

मात्र ग्रामविकास आणि महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंनी त्यांच्या नावापुढे चौकीदार शब्द लिहिला नाही त्यामुळे सर्वांच्या भुवया वर झाल्या आहेत. त्या कोणावर नाराज तर नाहीत ना अशा चर्चांना उधाण आले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *