१ तासापूर्वी शरद पवार यांच्या भेटीला आलेल्या धनंजय मुंडे यांची बैठक अद्याप चालूच
मुंबई: संध्याकाळी ४ वाजता सुरू झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या व नेत्यांच्या बैठकीला अचानक अजित पवारांसोबत गेलेले धनंजय मुंडे यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांना “मी इथेच” असल्याची प्रतिक्रिया दिली. १ तास उलटून गेला तरी ही बैठक अद्याप चालू असून यामुळे निरनिराळ्या चर्चांना उधाण आले आहे.
याच सोबत अजित पवार यांची भेट घेऊन आलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांनी “पक्ष फुटण्यापासून वाचवायचा असेल तर भाजपसोबत चला” असा निरोप शरद पवारांसाठी दिला असल्याचे कळते.