जे अपात्र होतील त्यांच्याविरोधात तिन्ही पक्ष एकत्र काम करतील : शरद पवार
मुंबई: राज्यातील मोठ्या राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त पत्रकार परिषद मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी फारकत घेत भाजप सोबत जाण्याच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, “अजित पवार यांनी काही आमदारांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांचा निर्णय पक्षाच्या विरोधात आहे. प्रामाणिक कार्यकर्ता भाजपसोबत जाणार नाही.”
पुढे ते म्हणाले की, “१० ते ११ सदस्य अजित पवारांसोबत आहेत, जे अपात्र होतील त्यांच्याविरोधात तिन्ही पक्ष एकत्र काम करतील.”
याठिकाणी जे आमदार राजभवनावर अजित पवारांसोबत होते त्यातले डॉ. राजेंद्र शिंगणे, संदीप क्षीरसागर व आणखी एक आमदार यांनी आम्ही शरद पवारांसोबत असल्याचे जाहीर केले.
