जाणून घ्या ‘शॅडो कॅबिनेट’ म्हणजे नेमकं काय ते
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं महाअधिवेशन सध्या मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को येथे चालू असून आज सकाळच्या सत्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं. यानंतर त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांची पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली.
आज एक विशेष घोषणा मनसेतर्फे करण्यात आली ती म्हणजे नव्याने स्थापन करण्यात येणाऱ्या शॅडो कॅबिनेटची. यावेळी साऱ्यांना पडलेला प्रश्न म्हणजे नेमकं शॅडो कॅबिनेट हा काय प्रकार आहे? चला तर जाणून घेऊयात या प्रश्नाचं उत्तर.
शॅडो कॅबिनेट?
जसं कोणत्या सरकारचं एक कॅबिनेट असतं की ज्यात विविध खात्यांचे मंत्री असतात. तशाच स्वरूपाचं एक साधारण १५-२० मंत्र्यांचं विरोधीपक्षाचं एक शॅडो कॅबिनेट असतं जे सरकारमधील मंत्र्यांच्या कामावर लक्ष ठेवतं. कुठे भ्रष्टाचार तर होत नाही ना यावर लक्ष ठेवणे हे त्यांचं प्रमुख काम असतं.
आता मनसेच्या या शॅडो कॅबिनेट मध्ये कोणा कोणाची वर्णी लागणार हे पाहणे औत्सुक्याचे राहील.
