Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पक्षाचा व्हीप झुगारुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदें सह बंडखोर ३८ आमदारांचं नार्वेकरांना मतदान

पक्षाचा व्हीप झुगारुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदें सह बंडखोर ३८ आमदारांचं नार्वेकरांना मतदान

मुंबई, दि. ३ : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटातल्या आमदारांनी व्हिप झुगारुन राहुल नार्वेकर यांना मतदान केलं. या मतदानाचं व्हिडीओ चित्रीकरण जतन करुन ठेवावं आणि या आमदारांची नावं नोंदवून ठेवण्याचे आदेश, झिरवळ यांनी दिले. शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांनी ही मागणी केली होती.

विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाचं कामकाज आज सकाळी ११ वाजता सुरू झालं. नवीन मंत्री आणि नव्या विधानसभा सदस्यांची ओळख झाल्यावर आवाजी मतदानानं अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची घोषणा झिरवळ यांनी केली. मात्र सदस्यांच्या मागणीवरुन मतविभाजन पद्धतीनं हे मतदान घेण्यात आलं.

मतदान सुरू होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील म्हणाले, आम्ही वारंवार ही निवडणूक घेण्याची विनंती करत होतो. ती आता मान्य केल्याबद्दल राज्यपालांचे आभार. राज्यपालांनी आता विधानपरिषदेसाठी आम्ही पाठवलेल्या १२ आमदारांचीही यादी मंजूर करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *