Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

”अरे स्त्री म्हणजे काय एखादा सण, पुण्यतिथी, जयंती आहे का …?” वाचा सामाजिक कार्यकर्त्या सपना फुलझेले यांचे महिला दिनाबाबत परखड मत

”अरे स्त्री म्हणजे काय एखादा सण, पुण्यतिथी, जयंती आहे का …?” वाचा सामाजिक कार्यकर्त्या सपना फुलझेले यांचे महिला दिनाबाबत परखड मत

तिच्या डायरीतून

हुश्श …..! आटोपला रे बाबा ….केवढी तयारी ….किती हा जिवाचा आटापिटा ……संपला बाबा….एकदाचा …असंच वाटतंय ना ….!
एव्हाना उतरला असेल ना ……तुमच्या बेगडी महिलादिनाचा मुखवटा. दिवसभर खूप थकले असाल तुम्ही, स्त्री स्वातंत्र्य, महिला सबलीकरणाच्या पोकळ बाता आणि स्त्री पुरुष समानतेचा अभिनय करून…. आणि ती, ती झाली असेल …..पुन्हा एकदा सज्ज स्वतःला संसाररूपी वखरावर जुंपुन घेण्यासाठी गायढोरासारखी…..
हो ….. गायढोरासारखीच. काय फरक काय …? बैल पोळा आणि महिलादिनात. दोन्ही एका दिवसाचेच अवडंबर ना …! गाय बैलांना ही या एक दिवशी त्यांच्या कर्तव्यातून मुक्ती देऊन त्यांना लाड लाड सजवतात, मखरात बसवतात, गोडाधोडाचे जेवण, गावातून मिरवणूक, शब्दांच्या स्तुतीसुमनाने पुजाअर्चना, कृतज्ञता आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा घाण्यालाच…! महिलादिनात ही यापेक्षा काही वेगळं होतं का …?
किव करावी वाटते कधीकधी स्वतःच्या स्त्री होण्याची.
”अरे स्त्री म्हणजे काय एखादा सण, पुण्यतिथी, जयंती आहे का …? एक दिवस साजरी करण्यासाठी.”
अरे जगाची जननी, निर्माति ‘ती’ फक्त एका दिवसाचे महात्म्य मिळवण्यासाठी का हा निसर्गाचा डोलारा सांभाळतेय….? नकोय तिला तुमचा हा नाटकीय भाव, हा दुटप्पीपणा, मनाचा कोतेपणा, तुमची स्तुतीपर वक्तव्ये, फुलमाळा हारतुरे, ह्या हपापलेल्या नजरा, हे ओरबाडणारे हात, ही जीवघेणी घुसमट, हे पुरुष प्रधान संस्कृतीचे गोडवे गाऊन तिला बंधनात जखडुन ठेवण्याची मानसिकता नकोय तिला…
अरे दयायचेच आहे ना तर द्या ना स्वातंत्र्य तिला तिच्या अभिव्यक्तीचे, मुक्तीचे.
द्या तो विश्वास की सुरक्षित आहे ती तिच्या पारंपारीक चौकटीबाहेर ही.
स्वतंत्र आहे ती एक व्यक्ती म्हणुन, माणुस म्हणुन.
द्या ना …तिला तिच्या अंगणा बाहेर ही एक निरभ्र आकाश, जिथं तिचं ही एक स्वच्छंद अस्तित्व असेन.
द्या तो विश्वास …. तो आधार ….. तो हात जो तिला सावरण्यासाठी असेल.
जेव्हा हे होईल तेंव्हा कोणत्या महिलादिनाची गरज भासणार नाही कारण सर्व दिवस तिचेच असणार …तिच्या साठीच असणार …
‘ति’च असणार ….!!!
. सपना फुलझेले,नागपूर

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *