Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पंतप्रधान मोदी गांजा पितात का? – संजय सिंह

पंतप्रधान मोदी गांजा पितात का? – संजय सिंह

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे खेळ सुरु आहेत. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. मोदी गांजा तर ओढत नाहीत ना? असा वादग्रस्त सवाल करत त्यांनी नव्या वादाला आमंत्रण दिले आहे.

गुरुवारी पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशच्या मेरठ येथून प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी मोदींनी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर सडकून टीका केली. सपा, रालोद आणि बसपा या पक्षांचे गठबंधन म्हणजे शराब असा उल्लेख केला होता.

मोदी यांच्या याच वक्तव्यावर पलटवार करत सिंह यांनी ट्विट करत ‘मोदींची चौकशी करा. ते गांजा तर ओढत नाहीत ना? राजकीय पक्षांना शराब, हेरॉईन आणि कोकेन असे तर चौकातील टपोरी नेता बोलू शकतो, पंतप्रधान नाही.’ असे म्हटले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

त्याचप्रमाणे मोदींना ‘श’ आणि ‘स’मधील फरक कळत नाही हे समजावून सांगण्यासाठी त्यांनी अभिनेत्री नुतन यांच्या चित्रपटातील एक व्हिडिओही शेअर केला आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *