Sanjay-Raut-Edited
जैशला पूर्णपणे नष्ट केल्याशिवाय आपला बदला पूर्ण होणार नाही – खा. संजय राऊत
जम्मू काश्मीर मधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारताने पाकिस्तानमधील बालाकोट भागात थेट हल्ला केला असून या हवाई हल्ल्याद्वारे तेथील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. आज पहाटे भारतीय वायूसेने केलेल्या अभिमानास्पद कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही वायूसेनेच्या या कामगिरीचे ट्विटरच्या माध्यमातून अभिनंदन केले आहे. हिंदुस्तानच्या फायटर विमानांनी पाकव्याप्त काशमीरवर हल्ला केला. वायू सेनेचे अभिनंदन. जैश ए मोहम्मदचा सैतान अजहर मसुदला मारल्या शिवाय बदला पुर्ण होणार नाही.” असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.
हिंदुस्तानच्या फायटर विमानांनी पाकव्याप्त काशमीर वर हल्ला केला. वायू सेनेचे अभिनंदन. जैश ए मोहम्मद चा सैतान अजहर मसुद ला मारल्या शिवाय बदला पुर्ण होणार नाही.
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 26, 2019
