संजय राऊत यांनी तब्बेतीची काळजी घ्यावी; रावसाहेब दानवे यांनी खोचक टीका
मुंबई: दोन दिवसांपूर्वी भाजपने सत्तास्थापनेचा दावा करत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदी बसवलं. यानंतर मोठा राजकीय भुकंप झालेला संबंध महाराष्ट्राने पहिला. यावर महाशिवआघाडीने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या साऱ्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषद घेत निवेदन सादर केले. ज्यात त्यांनी दावा केला कि विश्वासदर्शक ठरावापूर्वी अजित पवार जो व्हीप काढतील तो राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना लागू असेल.
यावेळी त्यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या भाजप आणि भाजप नेत्यांसंदर्भातील वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणले कि, “सत्ता येण्याची वाट पाहताना संजय राऊत यांना वेड लागले आहे. त्यांना कुठल्यातरी वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज आहे. काय बोलावे आणि काय बोलू नये हे त्यांना आताही सुचत नाही. त्यांनी त्यांच्या तब्बेतीची काळजी घ्यावी असा खोचक सल्लाही त्यांनी राऊत यांना दिला.
