‘अशा’ दिल्या संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज जन्मदिन आहे. त्यांच्यावर सर्व क्षेत्रातील लोकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही आपल्या या एकेकाळच्या शिवसनेतील नेत्याला व मित्राला ट्विटर च्या माध्यमातून हटके शुभेच्छा दिल्या आहेत.
ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, “वाद वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले..असे व्यंगचित्रकार..रसिक मनाचे राजकारणी श्री. राज ठाकरे @RajThackeray यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
जय महाराष्ट्र”
वाद वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले..असे व्यंगचित्रकार..रसिक मनाचे राजकारणी श्री. राज ठाकरे @RajThackeray यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
जय महाराष्ट्र pic.twitter.com/IfV32Cfac6— Sanjay Raut (@rautsanjay61) June 14, 2020
असे मानले जाते की राज ठाकरे यांनीच संजय राऊत यांना ‘सामना’त व शिवसेनेत आणले होते. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्या नंतर त्यांची मनधरणी करण्यासाठी राऊत यांनी राज ठाकरे यांच्या कृष्णाकुंज या निवासस्थानी धाव घेतली होती. पण त्यावेळी त्यांना राज यांचे मन वळवण्यात अपयश आले होते. पण यानंतरही राज ठाकरे व राऊत यांचे संबंध आज पावेतो मित्रत्वाचेच राहिले आहेत.
