मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
मुंबई, दि. ४ : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर केला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विनंतीनुसार राठोड यांच्या खात्याचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे देण्यास मंजुरी दिली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर संजय राठोड यांचे नाव चर्चेत येत होते. विरोधीपक्ष भाजपने या प्रकरणी आंदोलनही केले होते. अखेर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला.
मुख्यमंत्र्यांकडून आजच (दि. ४ मार्च) दुपारी संजय राठोड यांच्या राजीनाम्याचे पत्र राज्यपालांना प्राप्त झाले होते. अपेक्षेप्रमाणे राज्यपाल कोश्यारी यांनी राजीनामा मंजूर केला.
