Saamana Logo
अंतराळातही…मोदी है तो मुमकीन है! – सामना
अंतराळातही… मोदी है तो मुमकीन है! या मथळ्याखाली शिवसेनेने आपल्या सामना या मुखपत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शब्दफुलांची उधळण करत त्यांचे अभिनंदन केलेय.
हिंदुस्थानच्या उपग्रहवेधी क्षेपणास्त्राद्वारे (ऍण्टी सॅटेलाइट मिसाईल) एक उपग्रह पाडण्यात आपल्या वैज्ञानिकांना यश आले. हिंदुस्थान कालपर्यंत परमाणू शक्ती होता. इंदिरा गांधींपासून अटल बिहारी वाजपेयींपर्यंत सर्वांनी हिंदुस्थानला परमाणू शक्ती बनविण्यासाठी शर्थ केली, पण मोदी यांच्या काळात आपण अंतरिक्ष महाशक्ती बनलो आहोत. पंतप्रधान मोदी यांच्या कारकीर्दीत हा झेंडा फडकला याचा आम्हाला आनंद आहे. मोदी है तो मुमकीन है! जमिनीवर आणि अंतराळातसुद्धा! अशा शब्दांत शिवसेनेने मोदींवर कौतुकचा वर्षाव केला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी (२७ मार्च) देशवासीयांना गर्व वाटेल अशी घोषणा केली. अंतराळ विज्ञानात हिंदुस्थानने बुधवारी एक गरुडझेप घेतली. आमच्या वैज्ञानिकांनी अंतराळात ३०० कि.मी. दूर एलईओमध्ये (Low Earth Orbit) एका लाईव्ह सॅटेलाईटवर हल्ला करून त्याला उद्ध्वस्त केले. हिंदुस्थानच्या उपग्रहवेधी क्षेपणास्त्राद्वारे (ऍण्टी सॅटेलाइट मिसाईल) एक उपग्रह पाडण्यात आपल्या वैज्ञानिकांना यश आले. अशा स्वरूपाची कामगिरी करणारा हिंदुस्थान हा जगातील चौथा देश ठरल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली. ही बाब देशासाठी अभिमानाची आहे. अमेरिका, चीन, रशियानंतर आपण ही कामगिरी बजावली व त्याबद्दल देशाच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच! असे देखील शिवसेेेनेने म्हटले आहे.
