साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या संरक्षण समितीवरील नियुक्तीवरून राजकारण तापलं; काँग्रेस म्हणाली….”
नवी दिल्ली: बऱ्याचदा आणि बऱ्याच विवादांनी सतत घेरलेल्या भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय समितीवर नियुक्ती झाली आहे. यानंतर काँग्रेसने या विषयावर एक ट्विट करता आपला विरोध दर्शविला. या ट्विट मध्ये काँग्रेस म्हणतेय की, “शेवटी मोदींनी प्रज्ञा ठाकूर ला मनापासून माफी दिलीच. अतिरेकी हल्ल्यातील आरोपीची संरक्षण मंत्रालयातील समितीवर वर्णी लावणं म्हणजे त्या वीर जवानांचा अपमान आहे, जे दहशतवादयांपासून देशाला सुरक्षित ठेवत आहेत.”
या समितीत एकूण २१ सदस्य असून विशेष म्हणजे जम्मू आणि काश्मीर मधील नॅशनल कॉन्फरन्स च्या फारूक अब्दुला यांचीही या समितीवर वर्णी लावण्यात आली आहे. सध्यातरी या मुद्द्यावरून संसदेत राजकारण तापण्याची चिन्हे दिसतात. काँग्रेस हिवाळी अधिवेशनात यावरून गदारोळ करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी आरोपी आहेत.
