राजू शेट्टी म्हणजे उसाला लागलेला कोल्हा – सदाभाऊ खोत
सांगली: शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ इस्लामपूर येथे सभा घेण्यात आली. या सभेत बोलताना सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर निशाणा साधला.
राजू शेट्टी म्हणजे उसाला लागलेलं सर्वात मोठ कोल्हं आहे. या कोल्ह्याला आपल्याला हाकलून लावायचे आहे. हा कोल्हा कारखानादाराच्या मांडीला मांडी लावून नव्हे तर मांडीवर जाऊन बसलाय, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर जोरदार टीका केली.
आगामी निवडणुकीत आपल्याला सगळ्यांना या कोल्ह्याचा बंदोबस्त करायचा आहे. म्हणून धैर्यशील माने यांना निवडून द्या, असे आवाहन सदाभाऊ खोत यांनी केले. याप्रसंगी परिवहन मंत्री दिवाकर रावते, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पर्यावरण मंत्री रामदास कदम उपस्थित होते.
