Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

…म्हणून धनंजय मुंडेंनी आपली सभा रद्द केली

…म्हणून धनंजय मुंडेंनी आपली सभा रद्द केली

बीड: गुरुवारी सायंकाळी बीड लोकसभा मतदारसंघातील परळी शहरात विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची रात्री आठ वाजता जाहीर सभा होती. त्यात परळी हे मुंडेंचं होमग्राउंड असल्याने ते लोकप्रियही आहेत आणि त्यांना ऐकायला मोठ्या प्रमाणावर गर्दीही जमली होती.

साडे नऊ वाजता मुंडे यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी चक्क व्यासपीठावर येऊन ही सभा रद्द झाल्याचे जाहीर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. सूत्रसंचालकाच्या हातातला माईक घेत मला माफ करा मी आज येथे भाषण करणार नाही, पुन्हा कधीतरी नक्कीच येईन असे त्यांनी सांगितले. तुमच्याशी बोलण्यापेक्षा मला आज एका गोष्टीचे वाईट वाटत आहे की या भागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक प्रामाणिक कार्यकर्ता वैजनाथ दहातोंडे चे काही तासांपूर्वीच दुःखद निधन झाले आहे.

वैजनाथचे कुटुंबीय दुःखात असताना मला सभा घेणे योग्य वाटत नाही, त्यामुळे मी आज माझी सभा रद्द करतोय असे धनंजय मुंडेंनी सांगितले. श्रद्धांजली वाहून सभा संपल्याचे जाहीर करत सर्वजण आपल्या पुढच्या कार्यक्रमासाठी निघून गेले. धनंजय मुंडे यांच्या माणुसकीचे दर्शन पुन्हा एकदा परळीकरांना अनुभवता आले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *