Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आर.टी.ई. ॲक्ट २००९ अंतर्गत आरक्षित २५ टक्के प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरु

ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत ईमेल आयडीचे प्रयोजन

नवी मुंबई, दि. १८: बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) नुसार सन २०२४-२५ शैक्षणिक वर्षाकरिता अल्पसंख्यांक शाळा वगळून मान्यताप्राप्त खाजगी, महानगरपालिका, अनुदानित प्राथमिक शाळांमध्ये दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली किंवा पूर्वप्राथमिक वर्गात २५ % आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे.
शासनामार्फत सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील दि. १६ एप्रिल २०२४ पासून पालकांना ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी सुरु करण्यात आले आहेत. सदरचे अर्ज दि. ३० एप्रिल २०२४ पर्यंतच भरता येणार आहेत. सदर प्रवेश अर्ज भरण्यासाठी https://student.maharashtra.gov.in/adm_portal ही वेबसाईट देण्यात आलेली आहे. प्रवेश अर्ज भरण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना RTE २५ % प्रवेश पोर्टलवर दिलेल्या आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत पालकांना RTE २५ % ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी nmmcrte25@gmail.com हा ईमेल आयडी तयार करण्यात आलेला आहे याची नोंद घ्यावी तसेच याबाबतच्या अधिक माहितीसाठी खालीलप्रमाणे गटनिहाय केंद्र समन्वयक यांचेशी संपर्क साधण्यात यावा असे शिक्षणाधिकारी अरूणा यादव यांनी सूचित केले आहे.
नेरूळ केंद्र : रेखा पाटील – 9870035900
तुर्भे केंद्र : जयमाला पाटील – 9967281103
इंदिरानगर केंद्र : जयमाला पाटील – 9967281103
कोपरखैरणे 31 केंद्र : प्रशांत म्हात्रे – 9321525288
घणसोली केंद्र : संजय मोरे – 8433841446
कोपरखैरणे 38 केंद्र : चंद्रप्रकाश पाल – 8108932895
कातकरीपाडा केंद्र : रंजना साई – 8108087371
ऐरोली केंद्र : सुप्रिया पायरे – 9819176226
दिघा केंद्र : रंजना साई – 8108087371
शिरवणे केंद्र : सागरनाथ भंडारी – 9594782652
वाशी केंद्र : प्रशांत म्हात्रे – 9321525288

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *