Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

रिझर्व्ह बँके कडून केंद्र सरकारला ३० हजार ३०७ कोटी रुपये देण्यास अखेर मंजूरी

गव्हर्नर शक्तिकांता दास यांच्या अध्यक्षतेखाली रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी

मुंबई, दि.२०: भारतीय रिझर्व्ह बँकेने २०२१-२२ या वर्षासाठी ३० हजार ३०७ कोटी रुपयांचा अधिशेष केंद्र सरकारला द्यायला मंजुरी दिली आहे. गव्हर्नर शक्तिकांता दास यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या ५९६ व्या बैठकीत रिझर्व्ह बँकेचे वार्षिक अहवाल आणि खात्यांना मंजुरी देण्यात आली. सध्याची आर्थिक स्थिती, स्थानिक आणि जागतिक आव्हानं आणि भू-राजकीय परिस्थिती याबाबतच्या चर्चेसह आकस्मिक आव्हानांचा सामना करण्यासाठीचा प्रतिरोधक स्तर साडे पाच टक्के कायम ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर, केंद्रीय मंडळाचे अन्य संचालक यांच्यासह आर्थिक व्यवहार आणि वित्तीय सेवांचे सचिव या बैठकीत सहभागी झाल्याचं रिझर्व्ह बँकेने निर्गमित केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *