‘आरबीयाय’ च्या आदेशानुसार नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अखेर प्रशासकांची समिती नियुक्त
नाशिक: रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रशासकांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी याबाबतचे आदेश काल जारी केले.
बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून त्याठिकाणी प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले होते; मात्र, तत्कालीन संचालक मंडळाने उच्च न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळवली होती; गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने ही स्थगिती उठवून रिझर्व्ह बँकेच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.
Source – AIR