Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

गोव्यातील पणजी महापालिकेत ३० पैकी २५ जागा जिंकत भाजपने मिळवलं बहुमत

गोव्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत सत्ताधारी भाजपाचा विजय

गोवा: गोव्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत सत्ताधारी भाजपनं विजय मिळवला आहे. पणजी महापालिकेत ३० पैकी २५ जागा भाजपाच्या उमेदवारांनी राखल्या आहेत. इतर पालिका मतदारसंघातही भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. सहा महापालिका क्षेत्र, पणजी शहरातील ३० प्रभाग आणि जिल्हा पंचायत तसंच इतर २२ पंचायतींसाठी गेल्या शनिवारी मतदान झालं होतं.

गोव्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातल्या जनतेचे आभार मानले आहेत. हे निकाल म्हणजे भाजपच्या विकासाच्या धोरणाला जनतेकडून पाठबळ मिळत असल्याचे द्योतक असल्याचं ट्वीट मोदींनी केलं आहे. जनतेपर्यंत पोहोचून प्रचारकेल्याबद्दल मोदींनी भाजप कार्यकर्त्यांचंही कौतुक केलं आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *