Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

गँगस्टर रवि पुजारीला सेनेगलमधून भारतात आणले

गँगस्टर रवि पुजारीला सेनेगलमधून भारतात आणले

बेंगळुरू: गँगस्टर रवि पुजारीला सेनेगलमधून आज पहाटे भारतात आणण्यात आलं. खंडणी, हत्या आणि इतर अनेक गुन्ह्यांचे आरोप त्याच्यावर आहेत. बेंगळुरू पोलिसांनी त्याला फ्रान्समार्गे भारतात आणलं.

गेल्यावर्षी सेनेगल पोलिसांनी त्याला अटक केली होती. तेव्हापासून त्याच्या प्रत्यर्पणाचे प्रयत्न सुरू होते. मात्र तिकडच्या स्थानिक न्यायालयानं त्याला जामीन मंजूर केल्यानं तो सेनेगलमधून दक्षिण आफ्रिकेला पळून गेला होता.

मात्र काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिका आणि सेनेगल पोलिसांनी संयुक्त कारवाईत त्याला पकडले आणि सेनेगलमध्ये त्याला पाठवण्यात आलं.

Credit – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *