Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नवी मुंबईत गणेश नाईकांना धक्का; सुरेश कुलकर्णींसह ४ नगरसेवकांनी बांधलं शिवबंधन

नवी मुंबईत गणेश नाईकांना धक्का; सुरेश कुलकर्णींसह ४ नगरसेवकांनी बांधलं शिवबंधन

नवी मुंबई: नवी मुंबईतील गणेश नाईक गटातील भाजपच्या ४ नगरसेवकांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. माजी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी, त्यांची पत्नी नगरसेविका राधा कुलकर्णी, संगीता वास्के आणि मुद्रिका गवळी यांनी शिवबंधन बांधले. सुरेश कुलकर्णी हे तुर्भे प्रभागातील नगरसेवक असून माजी मंत्री गणेश नाईक यांचे ते एकेकाळचे कट्टर समर्थक होते. गणेश नाईक यांना नवी मुंबई महानगर पालिका निवडणुकीपूर्वी बसलेला हा मोठा धक्का असल्याचे मानले जाते.

काल झालेल्या या पक्षप्रवेशावेळी नगरविकास तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *