NCP Clock PNG
राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, वाचा कोण आहेत ‘ते’ उमेदवार
राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकांसाठी पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीत राष्ट्रवादीकडून एकूण 10 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर केली.
बारामतीतून सुप्रिया सुळे, साताऱ्यातून उदयन राजे भोसले, रायगडमधून सुनील तटकरे, कोल्हापुरातून धनंजय महाडिक यांच्यासह कल्याणमधून बाबाजी पाटील, ठाण्यातून आनंद परांजपे यांचीही नावं जाहीर करण्यात आली आहेत.
१) सुप्रिया सुळे – बारामती
२) उदयनराजे भोसले – सातारा
३) सुनील तटकरे – रायगड
४) आनंद परांजपे – ठाणे
५) बाबाजी पाटील – कल्याण
६) धनंजय महाडीक – कोल्हापूर
७) मोहम्मद फैजल – लक्षद्विप
८) संजय दीना पाटील – ईशान्य मुंबई
९) राजेंद्र शिंगणे – बुलडाणा
१०) गुलाबराव देवकर – जळगाव
११) राजेश विटेकर – परभणी
