रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपाच्या वाटेवर, आघाडीला मोठा धक्का
सोलापूर: विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखें पाटील यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्यातील खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनकडून देण्यात आली आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या उमेदवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिक्कामोर्तब करण्यात आला असल्याने रणजितसिंह भाजपमध्ये जाणार असल्याचे दिसून येते.
लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून पहिली आणि दुसरी यादी काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली. या दोन्ही यादीत खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांचे नाव जाहीर न झाल्याने नाराज झालेले खा. मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजप वारी करण्याचे निश्चित केले आहे.
