Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राज्यातल्या राज्यसभेच्या ६ जागांसाठी ‘या’ पक्षांकडून उमेदवार जाहीर

राज्यातल्या राज्यसभेच्या ६ जागांसाठी ‘या’ पक्षांकडून उमेदवार जाहीर

मुंबई, दि. १४: राज्यातल्या राज्यसभेच्या ६ जागांसाठी आतापर्यंत ५ उमेदवारांची घोषणा झाली आहे. भारतीय जनता पार्टीनं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसनं चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी दिल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. याच वेळी कॉंग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार राहिलेल्या मिलिंद देवरा यांना एकनाथ शिंदे यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे.

भाजपाचे नारायण राणे, प्रकाश जावडेकर, व्ही. मुरलीधरन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण, शिवसेनेचे अनिल देसाई आणि काँग्रेसचे कुमार केतकर यांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्यानं या निवडणुका होत आहेत. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करायचा शेवटचा दिवस आहे. अर्जांची छाननी शुक्रवारी होईल आणि गरज पडल्यास २७ फेब्रुवारीला मतदान होऊन त्याचदिवशी मतमोजणी होईल.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *