Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणी उद्या लागणार निकाल

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जाहीर करणार निकाल

मुंबई, दि. १४: राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या संध्याकाळी निकाल दिला जाणार आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा एक गट राज्यातल्या महायुती सरकारमध्ये सामील झाला. त्यानंतर राष्ट्रवादीत अजित पवार गट आणि शरद पवार गट एकमेकांसमोर आले. दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात आमदार अपात्रता याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांवर विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांसमोर सुनावणी झाली.
साक्ष नोंदणी, उलटतपासणी आणि अंतिम युक्तिवादानंतर ३१ जानेवारी रोजी सुनावणीचे कामकाज संपले. या याचिकांचा निकाल उद्या वाचून दाखवला जाणार आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निकाल दिलेला आहे. त्याला शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय.
Source – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *