अब्दुल सत्तार यांचा मंत्रीपदावरुन हटवण्याची केली मागणी
मुंबई, दि. १४ : मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यानंतर शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासह समविचारी पक्षांच्या महिला शिष्टमंडळाने आज सोमवार दि. १४ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी सांगितलं की, आज आम्ही राज्यपालांची भेट घेतली असून लवकरच आम्ही राष्ट्रपतींचीही भेट घेणार आहोत. महिलांचा अपमान सहन केला जाणार नाही. महिलांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या राजकारण्यांसह कोणीही उदाहरण मांडण्यासाठी हाकलून दिले पाहिजे. यावेळी खासदार फौजिया खान, खासदार जया बच्चन, खासदार प्रियांका चतुर्वेदी, खासदार वंदना चव्हाण, आमदार मनीषा कायंदे, आमदार अदिती तटकरे, आमदार सुमनताई पाटील, आमदार ऋतुजा लटके तसेच माजी आमदार विद्या चव्हाण आदी उपस्थित होते.
