राजू शेट्टी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले बैलगाडीतून…
कोल्हापूर: राजकारण म्हटलं की कोण काय करेल याचा काही नेम नाही. हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी हे गुरुवारी (ता. २८) उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चक्क बैलगाडीतून आले.
कोल्हापुरात अंबाबाईचे दर्शन घेऊन राजू शेट्टी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जयंत पाटील हे देखील बैलगाडीतून आले. यावेळी शेट्टी यांच्या बरोबर अर्ज भरण्यासाठी आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ आले होते.
राजू शेट्टी यांच्या बैलगाडीतील मिरवणुकीला शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी होती. स्वाभिमानी पक्षाचे झेंडे हातात घेऊन कार्यकर्ते यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
