खा. विनायक राऊत व आ. राजन साळवी यांच्या हस्ते राजापूर रोड रेल्वे लूप लाईन क्र. २ चे लोकार्पण
राजापूर रोड रेल्वे स्थानकात आज लूप लाईन क्र.२ कार्यान्वित करण्यात आली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत आणि लांजा-राजापूर विधानसभा आमदार राजन साळवी यांच्या हस्ते लूप लाईन क्र. २ चे कार्यान्वयन व लोकार्पण करण्याचे आले. ह्या प्रसंगी कोकण रेल्वे चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ही लाईन कार्यान्वित झाल्यामुळे कोकण रेल्वे वरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे आणि त्यायोगे वेळेची बचतही होणार आहे.