Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“मनसे भूमिका बदलते हे तुम्ही जरी म्हणत असलात तरी ते मला मान्य नाही” : मनसे अध्यक्ष राज ठाकरे

“मनसे भूमिका बदलते हे तुम्ही जरी म्हणत असलात तरी ते मला मान्य नाही” : मनसे अध्यक्ष राज ठाकरे

झेंड्याचा रंग बदलल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पहिल्यांदाच मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

शहरात ‘हिंदुजननायक’ राज ठाकरे असे होर्डिंग्स लावण्यात आले आहेत यावर प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की, “हा उल्लेख एका वृत्तवाहिनीने माझ्या ९ फेब्रुवारीच्या महामोर्च्याच्या वेळी केला होता हे प्रथम लक्षात घ्या आणि तुम्हाला जर आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी माझा उल्लेख ‘हिंदुहृदयसम्राट’ असा काही माझ्या सहकाऱ्यांनी केला ज्यावर मी दुसऱ्याच दिवशी सांगितलं की असा उल्लेख करू नका.”

शरद पवारांसोबतच्या मैत्रीबाबत विचारल्यावर ते म्हणाले की, “महाराष्ट्राचा इतिहास आहे की राजकीय भूमिकांवर जरी मतभेद असले तरी त्याचं रूपांतर व्यक्तिगत हेव्यादाव्यांमध्ये होत नाही; मध्यंतरी मी शरद पवारांना भेटलो ते ईव्हीएमच्या संबधीच्या काही मुद्द्यांवरून भेटलो होतो पण आपल्याकडे कोणी कोणाला भेटलं की लगेच माध्यमंच राजकीय मैत्री सुरु झाल्याच्या बातम्या सुरु करतात.”

पुढे पक्षाच्या बदलेल्या भूमिकेबाबत विचारलेल्या एका पत्रकाराच्या प्रश्नावर रे राज ठाकरे म्हणाले की, “मनसे भूमिका बदलते हे तुम्ही जरी म्हणत असलात तरी ते मला मान्य नाही. एक उदाहरण देतो, पाकिस्तानी कलाकारांना हिंदुस्थानांतील चित्रपटसृष्टीत काम करू देण्याला विरोध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यशस्वी विरोध केला होता, स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या कुठल्याही पक्षाने ह्याला विरोध केला नव्हता. रझा अकादमीच्या लोकांच्या विरोधात मोर्चा काढण्याची हिंमत फक्त मी दाखवली.. मशिदींवरचे भोंगे काढले पाहिजेत हे गेले अनेक वर्ष बोलणारा मी एकमेव आहे… मुंबईत अनधिकृतपणे बांग्लादेशी टॅक्सी, रिक्षा चालवत होते त्यावेळी आमच्या आंदोलनामुळे त्या टॅक्सी, रिक्षा कापल्या गेल्या. ह्या सगळ्यावेळी स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारा पक्ष कुठे होता? का नाही ते आंदोलनात सहभागी झाले. माझ्या झेंड्यात जरी आज बदल झाला असला तरी माझ्या पक्षाची भूमिका ही आधीपासून हीच आहे.”

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *