मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मागे लागू शकतं “ईडीचं” भूत
नवी दिल्ली/मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ईव्हीएम प्रश्न पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कोलकाता येथे भेट घेतली होती. पण यामुळे आता राज ठाकरे यांना वेगळ्याच डोकेदुखीचा सामना करावा लागणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात घोंगावते.
आय एल अँड एफ एस या फायनान्स कंपनी विरोधात चालू असलेल्या एका प्रकरणात सक्तवसुली संचालनालयातर्फे राज ठाकरे यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. त्याचं मूळ दादर येथील कोहिनूर मिल प्रकरणात गुंतले असल्याचे मानले जाते. या प्रकरणी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उमेश जोशी यांचीही चौकशी केली जाऊ शकते.
येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जर शिवसेना-भाजप युतीची मतं खाल्ली तर त्याचा परिणाम निकालांवर पडू शकतो त्यामुळे ईडी तर्फे चौकशीचा ससेमिरा लावून राज ठाकरे यांना दबावात ठेवले जात असल्याचे मत एका मनसे नेत्याने व्यक्त केले आहे.