Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

……की एखादी जुलमी राजवट उलथवली जाऊ शकते : राज ठाकरे

……की एखादी जुलमी राजवट उलथवली जाऊ शकते : राज ठाकरे

मुंबई: आज जागतिक व्यंगचित्रकार दिन. या दिनाचं औचित्य साधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटर च्या माध्यमातून शुभेच्छा देताना व्यंगचित्रांच्या परिणाकारकतेवर भाष्य केले आहे. ते आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की, “व्यंगचित्रकाराच्या कुंचल्यात इतकी ताकत असते की एखादी जुलमी राजवट उलथवली जाऊ शकते. आज जागतिक व्यंगचित्रकार दिन ह्या निमित्ताने देशभरातील माझ्या व्यंगचित्रकार सहकाऱ्यांना शुभेच्छा तर आहेतच पण तुमच्या प्रतिभेची देशाला आज सगळ्यात जास्त गरज आहे हे मात्र विसरू नका.”

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात राज ठाकरे यांनी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर सातत्याने टीका केली. निवडणुकांच्या या हंगामाआधी त्यांनी या दोन नेत्यांवर व्यंगचित्रांच्या माध्यमातून टीकास्त्रही सोडले होते. राज ठाकरे यांना व्यंगचित्रांचा वारसा त्यांचे काका अर्थात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून लाभला आहे. राज ठाकरे यांनी सर जे. जे. स्कूल ऑफ अप्लाईड आर्ट, मुंबई येथून आपलं कलाशिक्षण पूर्ण केलं आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *