Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

कोल्हापूरसह कोकण किनारपट्टीवर येत्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता

कोल्हापूरसह कोकण किनारपट्टीवर येत्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई, दि. १६: देशातील अनेक राज्यांमधून मान्सूनने माघार घेतली असली तरी, गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. येत्या दोन दिवसात देशात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील, तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.देशाच्या पूर्वेकडच्या राज्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जम्मू आणि काश्मीर, राजस्थान, कोकण किनारपट्टीसह कर्नाटकमध्ये आज विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तमिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी, कराईकल आणि माहेच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
महाराष्ट्रात ऑक्टोबर हीट चा तडाखा सर्वदूर जाणवत असून प्रचंड उकड्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. अशातच राज्यात कोल्हापूरसह कोकण किनारपट्टी भागात पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तात्पुरती का होईना पण नागरिकांची उष्म्यापासून सुटका होण्याची शक्यता आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *